शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 09:48 IST

Corona Virus: एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही.

ठळक मुद्देहॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात मी चाणक्य निती हे पुस्तकही वाचलं दिल्लीतला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण झाला बरा घरी १४ दिवस बाहेर न पडण्याची डॉक्टरची सूचना

नवी दिल्ली - जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धसका घेतला आहे. आतापर्यंत ६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या व्हायरसचा प्रार्दुभाव अन्य देशांमध्ये पोहचला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०० च्या वर पोहचली आहे. 

मात्र या आजाराबाबत सकारात्मक बातमी दिल्लीतून समोर येत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला व्यक्ती पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात या रुग्णाला ठेवण्यात आलं होतं. मात्र विलगीकरण कक्ष म्हणजे नेमका कसा आहे याची कल्पना बाहेरच्या व्यक्तींना नाही. दिल्लीतल्या सफरजंग हॉस्पिटलमधून विलगीकरण कक्षातून बाहेर पडलेले रोहित दत्ता यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे. 

विलगीकरण कक्ष सोयीसुविधांनी सुसज्ज असा रुम आहे जो एका हॉटेलच्या लक्झरी रुमपेक्षा कमी नाही.  एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली रुम आहे. दरदिवशी याठिकाणी साफसफाई करण्यात येत होती. त्याचसोबत मोबाईल फोन वापरण्याची परवानगी होती त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत होतो. त्याचसोबत नेटफिल्क्सवर व्हिडीओ पाहत होतो. मागील १४ दिवसांपासून मला त्या कक्षात ठेवण्यात आलं होतं असं रोहित दत्ता यांनी सांगितले. 

रोहित दत्ता यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं असून खबरदारी म्हणून त्यांना घरातून १४ दिवस बाहेर न पडण्याची सूचना दिली आहे. विलगीकरण कक्षात मी रोज प्राणायम करत होतो. हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. पहिल्यांदा मला त्रास झाला तेव्हा तपासणी करण्यात आली त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने मी घाबरून गेलो. पण डॉक्टरांनी मला या आजाराबाबत समजवल्यानंतर माझी भीती दूर झाली. जीव धोक्यात घालून डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात. मात्र ते आमचं कर्तव्य आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याचं दत्ता म्हणाले. 

रोहित दत्ता हे टेक्सटाइल व्यवसाय करतात. काही कामानिमित्त फेब्रुवारी महिन्यात ते इटली येथे गेले होते. ज्यावेळी मी गेलो तेव्हा इटलीत या आजाराचा प्रार्दुभाव झाला नसल्याची माहिती होती. काही नातेवाईकांसोबत त्यांनी युरोपियन देशांचा दौरा केला होता. बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराने धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात मी चाणक्य निती हे पुस्तकही वाचलं असल्याचं रोहित दत्ता यांनी सांगितले.   

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनItalyइटलीhospitalहॉस्पिटल