शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Coronavirus in India: कोरोनाने 8 महिन्यांचा विक्रम मोडला, गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 10:01 IST

Coronavirus in India: भारतात ओमायक्रॉनची एकूण प्रकरणे 9,287 वर पोहोचली आहेत.

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा(Coronavirus ) फैलाव सुरू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3,17,532 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, संसर्ग दर(पॉझिटिव्हिटी रेट) 16 टक्क्यांच्या वर गेला आहे. यासोबतच ओमायक्रॉन या विषाणूच्या रुग्णांची संख्याही 9 हजारांच्या पुढे गेली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांमध्येवाढकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या 24 तासांत 491 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे आतापर्यंत एकूण 4,87,693 लोकांनी आपला जीव गमावला आहे. दुसरीकडे, भारतात ओमायक्रॉनची एकूण प्रकरणे 9,287 वर पोहोचली आहेत. त्यात कालच्या तुलनेत 3.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात 19,24,051 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. एकूण प्रकरणांपैकी 5.03 टक्के सक्रिय प्रकरणे वाढली आहेत. 

आतापर्यंत 159 कोटींपेक्षा जास्त लसीकरणदिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोबीस तासांत 2,23,990 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत तर आतापर्यंत 3,58,07,029 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. दैनंदिन संसर्ग दरही 16.41 टक्के वाढला तर साप्ताहिक संसर्ग दर 16.06 टक्के झाला आहे. याशिवाय, देशभरात आतापर्यंत 159.67 कोटी डोस देण्यात आले आहेत. काल 73 लाख 38 हजार 592 डोस देण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस