शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Corona Virus: कोरोना ९४ देशांत; पंजाबात दोघांना लागण; जगात तब्बल १ लाख रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:52 IST

चीनमधील बळींची संख्या ३,०७०, संशयित रुग्ण असलेली इमारत कोसळून ७० जण ढिगाऱ्याखाली अडकले

बीजिंग : चीनमध्येकोरोनामुळे शनिवारी आणखी २८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या ३०७० झाली आहे. चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १ लाखांवर पोहोचली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. कोरोना आता ९४ देशांमध्ये पसरला आहे, तर १,०२,१८० लोकांना संसर्ग झाला आहे. यातील ८०,६५१ रुग्ण चीनमधील आहेत. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, या रोगाचे नवे ९९ रुग्ण आढळून आले आहेत, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण विषाणूंचे केंद्र हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानच्या बाहेरचे आहेत.

हॉटेलची इमारत कोसळलीचीनमध्ये कुआनझाऊ शहरात शनिवारी एका हॉटेलची इमारत कोसळून ७० लोक ढिगाºयाखाली अडकले आहेत. कोरोनाच्या संशयित रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जात होता. फुजियान प्रांतातील ८० खोल्यांची ही इमारत स्थानिक वेळेनुसार रात्री ७.३० वाजता पडली. मदत करणाºया पथकाने ३३ लोकांना ढिगाºयातून बाहेर काढले आहे. ७० लोक अजूनही ढिगाºयाखाली अडकले आहेत.जहाजावर २१ जणांना संसर्गअमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोच्या किनाºयालगत उभ्या असलेल्या जहाजावर २१ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यातील १९ जण चालक दलाचे सदस्य आहेत. यातील सर्व ३५३३ प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रँड प्रिन्सेस हे जहाज बुधवारपासून सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अडकले आहे. चीनमध्ये थकले ५००० कोटी; सुरतचा हिरे व्यापार अडचणीत जगातील सर्वात मोठा हिºयांचा व्यापार सुरतमध्ये चालतो. मात्र, चीन आणि हाँगकाँगमधील थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा उद्योग सध्या अडचणीत आला आहे.

उद्योग वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, चीन आणि हाँगकाँगमधील थकबाकीचा हा आकडा ५ हजार कोटी रुपये एवढा आहे. ही थकबाकी गत एक महिन्यातील आहे. रत्न आणि ज्वेलरी निर्यात करणाºया संघटनेने अलीकडेच वाणिज्य मंत्रालय, बँकांना अशी विनंती केली होती की, येणाºया थकबाकीमुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा. पॉलिश करण्यात आलेल्या हिºयांसाठी चीन आणि हाँगकाँग ही अमेरिकेनंतरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.राजस्थानातील स्थानिकांचे सर्व अहवाल आले निगेटिव्हजयपूर : राजस्थानात तपासणी करण्यात आलेल्या संशयित कोरोना रुग्णांपैकी एक इटालियन जोडपे वगळता सर्वांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहे. राज्याचे अतिरिक्त आरोग्य सचिव रोहितकुमार सिंग यांनी सांगितले की, राजस्थानात एकूण २८२ रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. २८० जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. दोन जणांना (इटालियन जोडपे) मात्र विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाग्रस्त जोडप्यास जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३१ झाली आहे.

कोरोनाग्रस्त ज्येष्ठ इटालियन जोडप्याने २१ ते २८ फेब्रुवारी यादरम्यान राजस्थानातील झुनझुनू, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर आणि जयपूर या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे तपासणी नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी कोणालाही लागण झालेली नसल्याचे आढळून आले आहे.

नुकताच इटलीचा प्रवास करून आलेल्या दोन पंजाबी व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यांना अमृतसरमधील गुरू नानकदेव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतसरचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप कौर जोहल यांनी सांगितले की, हे दोघे जण बुधवारी इटलीहून परतले. ते पहिल्यांदा दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेथून विमानाने अमृतसरमधील श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले.

अमृतसर विमानतळावरील तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गुरू नानकदेव रुग्णालयात पृथक कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत इटलीहून परतलेल्या त्यांच्या कुटुंबियांना लागण झाली नसल्याचे आढळून आले आहे. ते पंजाबातील होशियारपूर येथील रहिवासी आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन संशयित कोरोना रुग्णांना तीव्र स्वरूपाचा विषाणू संसर्ग (हाय व्हायरल-लोड केसेस) झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना पृथक कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण झालेली असण्याची दाट शक्यता असल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनPunjabपंजाब