शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Corona Update : दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:34 IST

Corona Update : कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत.

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 2,927 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,203 प्रकरणे म्हणजे जवळपास निम्मी प्रकरणे दिल्लीतील आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत एका मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, ही दिलासादायक बाब आहे की भारतातील एकूण मृत्यूंची संख्या फारशी जास्त नाही. तसेच, यावेळी कोरोनाचे गंभीर रुग्ण सुद्धा कमी आहेत.

निर्बंध हटवल्याने प्रकरणे वाढलीकोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. वाढत्या प्रकरणांनंतरच दिल्ली सरकारला पुन्हा मास्क अनिवार्य करावे लागले आणि 500 ​​रुपयांचा दंडही ठोठावला गेला. दिल्लीसह भारतात ओमायक्रॉन (B.1.1.529) आणि त्याचे सब-व्हेरिएंट BA.2.12.1 मुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

ओमायक्रॉनचा आढळला सब-व्हेरिएंटदिल्लीतील ILBS म्हणजेच Institute of Liver and Biliary Science मधील Genome Sequencing Lab मध्ये  ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आढळला आहे. नवीन सब-व्हेरिएंट (BA.2.12.1) मधील पॉझिटिव्ह आढळलेले सॅम्पल कोविड-19 जीनोम सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम INSACOG कडे पाठवण्यात आले आहेत.

सॅम्पलची सिक्वेन्सिंग सुरूदिल्लीमध्ये BA.2.12.1 चा संसर्ग फक्त एकाच ठिकाणी किंवा संपूर्ण शहरात मर्यादित होता की नाही हे आता अधिक जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे तपासले जात आहे. 9 एप्रिलपासून दिल्लीने 25 किंवा त्याहून अधिक सीटी मूल्यांसह सॅम्पल सिक्वेन्सिंग करण्यास सुरुवात केली, तेव्हा नवीन व्हेरिएंट आढळून आले. भारतात 95 टक्के प्रकरणांमध्ये कोरोनाचे फक्त ओमायक्रॉन व्हेरिएंट्स आढळून येत आहेत. आतापर्यंत 8 हून अधिक व्हेरिएंट्स सापडले आहेत आणि ओमायक्रॉनचे आणखी व्हेरिएंट्स पसरण्याची शक्यता आहे.

दिल्लीत अद्याप XE व्हेरिएंट आढळला नाही दिल्लीत अजून XE व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले नाही. WHO च्या मते, हा XE व्हेरिएंट इतर सर्व व्हेरिएंट्सपेक्षा वेगाने पसरू शकतो. दरम्यान, पंतप्रधानांनी आज जी चर्चा केली, त्यामध्ये त्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवरही भर दिला, जेणेकरून नवीन व्हेरिएंट्स वेळेत शोधता येतील. मास्क लावल्याने केवळ कोरोनाच नाही तर इतर अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो आणि दिल्ली एनसीआरच्या प्रदूषित शहरांमध्येही मास्क धूळ आणि धुरापासून संरक्षण करतो, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते मास्क हा जीवनाचा एक भाग मानला पाहिजे. 

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन