शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 23:44 IST

Corona Virus Update: देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे...

देशातील महानगरांमध्ये कोरोना (Corona Virus) रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढाताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दैनंदीन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर महाराष्ट्रातही रोजच्या रोज 2 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित समोर येऊ लागले आहेत (Maharashtra Corona Update).

महाराष्ट्रात सातत्याने वाढतायत रुग्ण -महाराष्ट्रासंदर्भात बोलायचे झाल्यास, राज्यात रविवारी 2,946 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,432 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आज राज्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16,370 एवढी आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देशातील नव्या रुग्णांची संख्या 8 हजारांच्याही पुढे गेली आहे.

दिल्लीत नव्या कोरोना बाधितांनी 700 चा टप्पा ओलांडला -दिल्लीत रविवारी पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांनी 700 चा टप्पा ओलांडला. दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 795 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 556 जण बरे होऊन घरी परतले असून कुणाचाही मृत्यू झालेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे 2,247 सक्रिय रुग्ण असून मृत्यू दर 4.11 टक्के एवढा आहे. दिल्लीत आतापर्यंत 19,12,063 रुग्ण समोर आले आहेत. तर 18,83,598 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 26,218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे देशाची स्थिती -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 8,329 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कालच्या तुलनेत हा आकडा 745 ने अधिक आहे. याच बरोबर आता देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे. तर, गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 3,44,994 चाचण्यांमध्ये दैनिक सकारात्मकता दर 2.41 असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, साप्ताहिक सकारात्मकता दर 1.75 टक्के नोंदवण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस