शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 06:33 IST

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील खासगी रुग्णालयांना मे महिन्यात मिळालेल्या कोरोना लसींपैकी फक्त १७ टक्के लसींचा वापर झाला आहे. या रुग्णालयांत कोरोना लसींच्या असलेल्या किंमती खिशाला परवडत नसल्याने तिथे मोठ्या संख्येने लोक गेले नसावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मे महिन्यामध्ये सरकारी व अन्य रुग्णालयांना कोरोना लसीचे ७.१४ कोटी डोस देण्यात आले. त्यातील १.८५ कोटी डोस खासगी रुग्णालयांना देण्यात येणार होते. त्याऐवजी १.२९ कोटी डोस पाठविण्यात आले. त्यातील फक्त २२ लाख कोरोना डोस खासगी रुग्णालयांनी लोकांना दिले आहेत.

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते. या रुग्णालयांकरिता केंद्र सरकारने कोरोना लसीचे दर ठरवून दिले आहेत. खासगी रुग्णालयात कोविशिल्ड ७८० रुपये व स्पुतनिक व्ही ११४५ रुपये व कोवॅक्सिन लस १४१० रुपयांना उपलब्ध आहे.

नव्या धोरणाची योगदिनाशी सांगडn    केंद्र सरकार नवे लस धोरण येत्या २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनापासून राबविणार आहे.n    कंपन्या बनवत असलेल्या कोरोना लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार विकत घेईल. २५ टक्के लसी खासगी रुग्णालये खरेदी करूशकतील.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या