शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: लसींचा वापर सुरक्षित; काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 05:04 IST

उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष, भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती

नवी दिल्ली : काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नसल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले आहे. या लसींच्या आपत्कालीन वापरास भारताच्या औषध नियंत्रकांनी या वर्षाच्या प्रारंभी मान्यता दिली हाेती. 

भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने ४०० हून अधिक दुष्परिणामाच्या घटनांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल समितीने सादर केला आहे. काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिनमुळे अनियमित रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या बनत नसल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, यापुढेही परिस्थितीचा अभ्यास करण्याचे कार्य सुरूच राहील, असे समितीने स्पष्ट केले आहे. 

ब्रिटनमधील औषध निर्माती कंपनी ‘ॲस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या काेविशिल्ड या लसीचे भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादन करण्यात येत आहे. तर, भारत बायाेटेक या कंपनीने ‘आयसीएमआर’च्या सहकार्याने स्वदेशी ‘काेव्हॅक्सिन’ लस विकसित केली आहे.  अनेक युराेपियन देशांनी या लसीचा वापर थांबविला हाेता. मात्र, युराेपियन औषध नियंत्रकांनी लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर लसीचा पुनर्वापर सुरू झाला आहे. 

सर्दीचा विषाणू करताे काेराेनाच्या विषाणूचा खात्मापृथ्वीवरील प्राणिमात्रांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असताे. डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामागे हा महत्त्वपूर्ण नियम आहे. हा नियम विषाणूंमध्येही आढळून आला असून, अशा संघर्षातून काेराेनाच्या विषाणूलाही एक विषाणू संपवित असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू अगदी साध्या सर्दी-पडश्याला कारणीभूत असलेला विषाणू हाेय. हा विषाणू ‘ऱ्हायनाेव्हायरस’ म्हणून ओळखला जाताे. ब्रिटनच्या ग्लासगाे विद्यापीठाने याबाबत केलेल्या संशाेधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विषाणू आणि जंतू हे मानव किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात वास्तव्य करतात. काही विषाणू एकत्रितपणे मानवी शरीरात मित्रांप्रमाणे राहतात. मानवी पेशींवर हे विषाणू एकत्रपणे हल्ला करतात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस