शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोरोना लसीसाठी भारताकडून मोठी प्री-ऑर्डर; अमेरिकेपाठोपाठ भारताचा नंबर

By कुणाल गवाणकर | Updated: November 2, 2020 11:17 IST

Corona Vaccine: उत्पादन क्षमतेचा वापर करून भारताकडून कोरोना लसीसाठी आगाऊ नोंदणी

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८२ लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख २० हजारांपेक्षा अधिक आहे. देशातल्या तीन कंपन्या कोरोनावरील लसीसाठी संशोधन करत आहेत. आता भारतानं आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर करत ६० कोटी लसींची आगाऊ मागणी नोंदवली आहे. याशिवाय भारताकडून १ अब्ज डोससाठी बातचीत सुरू आहे. बहुतांश लसीकरणांमध्ये लसीचे दोन डोस द्यावे लागतात. त्या अनुषंगानं भारतानं कोरोना लसींची मागणी नोंदवली आहे.'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅनभारतानं नोंदवलेल्या लसींच्या डोसची आकडेवारी ग्लोबल ऍनालिसिस कंपनी ऍडव्हान्स मार्केट कमिटमेंट्सनं दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अमेरिकेनंतर भारतानं कोरोना लसींची सर्वाधिक नोंदणी केली आहे. अमेरिकेनं आधी कोरोना लसींच्या ८१ कोटी डोसची नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी १.६ अब्ज डोससाठी बातचीत सुरू केली आहे. अमेरिका आणि भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचावजगभरातील देशांनी कोरोना लसीसाठी केलेल्या नोंदणीची माहिती ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशनचे सहाय्यक संचालक (प्रोग्राम) एँड्रिया डी. टेलर यांनी दिली. 'अमेरिकेनं सर्वाधिक ८१ कोटी डोसची आगाऊ नोंदणी केली आहे. सध्याच्या घडीला अमेरिका आणखी १ अब्ज डोससाठी बातचीत करत आहे. युरोपियन युनियननं ४० कोटींची आगाऊ नोंद केली आहे. याशिवाय १.५६ अब्ज डोससाठी बातचीत सुरू आहे. कॅनडानं आपल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात डोसची नोंदणी केली आहे. त्यानंतर ब्रिटनचा क्रमांक लागतो,' अशी माहिती टेलर यांनी दिली.२० देशांनी स्पुटनिक-व्ही लसीसाठी आगाऊ नोंदणी केल्याची माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुकाश्को यांनी दिली. जगातल्या २० देशांनी कोट्यवधी डोसची ऑर्डर दिली आहे. यात अमेरिका आणि भारताचाही समावेश असल्याचं मुकाश्को यांनी सांगितलं. स्पुटनिक-व्ही लसीसाठी रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानं मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याचकडून लसीच्या उत्पादनासाठी मोठी गुंतवणूकही करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या