शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:07 IST

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील ५ कोटी १७ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली. 

नवी दिल्ली : कोणतीही सहव्याधी नसलेल्या ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना जावडेकर म्हणाले की, ४५ वर्षे वयावरील तसेच कोणत्याही सहव्याधी नसलेल्या व्यक्ती आता १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करूनच हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच लसीची दुसरी मात्रा सहा ते आठ आठवड्यांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्वांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केले.

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता ज्या राज्यांमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्य प्रमुखांशी केंद्र सरकार संपर्क साधून आहे. या राज्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जात असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ५ कोटी लोकांचे लसीकरण

  • केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील ५ कोटी १७ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली. 
  • देशात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे ते म्हणाले. दोन्ही लसींची परिणामकारकता उत्तम असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.

लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या नाहीत

  • काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नसल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले.
  • लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने ४०० हून अधिक दुष्परिणामाच्या घटनांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल समितीने सादर केला आहे. 
  • काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिनमुळे अनियमित रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या बनत नसल्याचे या समितीने म्हटले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस