शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 08:03 IST

लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले

एकीकडे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना सुरुवात झाली असताना लहान मुलांवरील लसीच्या बाबतीतही शुभवर्तमान आहे. झायकोव्ह-डी या कोरोनाप्रतिबंधक लसीच्या चाचण्या सध्या लहान मुलांवर सुरू असून त्यात लहान मुलांवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

लसीचे तीन डोस

झायकोव्ह-डी लसीचे तीन डोस देण्यात येतात.

चाचण्यांचे निष्कर्ष काय?लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले. काही जणांना तापही आला. झायकोव्ह-डी लस घेतल्यानंतर मात्र मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. लस घेतल्यानंतर थंडी वाजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात परंतु झायकोव्ह-डी लस टोचल्यानंतर मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. लस टोचल्यानंतर होणाऱ्या वेदना वगळता मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाही.

झायकोव्ह-डीविषयीझायकोव्ह-डी ही कोरोनाप्रतिबंधक लस झायडस कॅडिला या कंपनीतर्फे तयार करण्यात आली आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठीही लस असून तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. 

चाचण्या किती जणांवर?झायकोव्ह-डी लसीच्या चाचण्या देशभरात ५० ठिकाणी १६०० मुलांवर करण्यात येत आहेत. या १६०० मुलांमध्ये सर्व स्तरातील मुलांचा समावेश आहे. वार्षिक २ लाख ते ७० लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील मुलांवर झायकोव्ह-डीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या