शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू नाही; एम्सचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:37 IST

Corona Vaccination : ज्या लोकांनी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना हा आजार झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेन्शन असे म्हणतात. लस घेतलेल्या काही जणांमध्ये व्हायरल लोड जास्त असला तरी त्या संसर्गामुळे कोणीही मरण पावल्याचे उदाहरण समोर आले नाही. 

नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतरही या आजाराची बाधा झालेल्यांपैकी एकाही रुग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही, असे एम्सने एप्रिल व मेमध्ये केलेल्या पाहणीतून आढळून आले. कोरोना लस घेण्याबद्दल अनेक जण द्विधा मनस्थितीत असतात. ग्रामीण भागात कोरोना लसीकरणापासून काही लोक पळ काढताना दिसतात. अशा लोकांना या पाहणीच्या निष्कर्षामुळे दिलासा मिळणार आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही या आजाराने बाधित झालेल्या ६३ जणांच्या प्रकृतीचा एम्समधील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यापैकी एकही जण कोरोनामुळे मरण पावला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना लस ही माणसांसाठी उपकारक असल्याचे सिद्ध  झाले असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.ज्या लोकांनी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना हा आजार झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेन्शन असे म्हणतात. लस घेतलेल्या काही जणांमध्ये व्हायरल लोड जास्त असला तरी त्या संसर्गामुळे कोणीही मरण पावल्याचे उदाहरण समोर आले नाही. या पाहणीसाठी एम्सने ज्या ६३ रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास केला, त्यातील ३६ रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस तर २७ रुग्णांनी कोरोना लसीचा एकच डोस घेतला होता. त्या ६३ रुग्णांपैकी १० जणांनी कोविशिल्ड व ५३ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. त्यातील कोणीही कोरोनामुळे मरण पावलेले नाही. 

लसीमुळे प्रतिकारशक्तीत वाढ- कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्यांमध्ये व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांची या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकारशक्तीही वाढली.- कोरोनातून बरे झालेल्यांच्या अंगात याआजाराविरोधातील प्रतिकारशक्ती सुमारे तीन महिने कायम राहते. तर काही लोकांमध्ये त्याहून अधिक काळ प्रतिकारशक्ती टिकते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या