शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Corona Vaccination: तुमचा जन्म 1 जानेवारी, 1977 पूर्वी झालाय का? 45 वर्षावरील नागरिकांसाठी महत्वाची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 12:15 IST

Corona Vaccination Cut off date for 45 Years above age: 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले होते. तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरिअर्सना लस टोचली गेली. नंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती. यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती. 

कोरोना व्हायरसच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. गुरुवार म्हणजेच 1 एप्रिलपासून देशातील कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. कोरोना लस आता 45 वर्षांपुढील नागरिकांना देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी फक्त तुम्हाला 45 वर्षे पूर्ण (Corona Vaccination for 45 years age) झाली म्हणून लस टोचली जाणार नाही तर यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. या जन्मतारखेपूर्वी तुमचा जन्म झाला असेल तरच तुम्हाला ही लस मिळणार आहे. (The government has set a cut-off date of January 1, 1977, for the next phase--any person born before this will be eligible for the vaccine from April 1. It is also making changes in the CoWIN platform.)

जन्मतारखेची अट काय....नोंदणी करण्यास जाण्यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 ला लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे 45 वर्षे व्हायला हवे. तसेच या नागरिकाचा जन्म 1 जानेवारी, 1977 आधी झालेला असायला हवा. जर तुमचा जन्म या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्हाला लस मिळणार आहे. काही दिवसांनी सरकार ही अट काढून टाकण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे. 

16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले होते. तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरिअर्सना लस टोचली गेली. नंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती. यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती. 

Coronavirus : उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचंही होणार लसीकरण; पाहा सेंटर्सवर कसं करता येईल रजिस्ट्रेशन

सर्टिफिकेट न मिळाल्यास काय...लस टोचलेल्याचे सर्टिफिकेट न मिळाल्यास 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देता येणार आहे. हे सर्टिफिकेट डिजिटलदेखील असणार आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासावेळी हे सर्टिफिकेट पाहिले जाणार आहे. अन्य ठिकाणीही हे सर्टिफिकेट लागू केले जाऊ शकते. 

प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी विनंतीच नाहीमहाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या