शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:55 IST

लसीकरण गतीत अन्य देशांच्या तुलनेत खूपच मागे

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  लसीकरणाच्या गतीत भारताने मोठे यश मिळविले आहे का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस अन्य देशांच्या लसीकरणाच्या गतीच्या तुलनेत भारत खूपच मागे असल्याचे म्हटले आहे.काँग्रेसने आज जी-२० देशांची यादी जारी करुन केंद्र सरकारला सवाल केला की, भारत या यादीत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर का आहे? हे आमचे मोठे यश आहे का? कोरोनाच्या साथीच्या काळात सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्यू पावलेल्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांंनी म्हटले की, देशाची एकूण लोकसंख्या १३९ कोटी आहे. यापैकी १०३ कोटी प्रौढ आहेत.  फक्त २९ कोटी लोकांना लसीचे दोन  डोस मिळाले आहेत. ४२ कोटी लोकांना एकच डोस मिळाला आहे. यावरून स्पष्ट होते की,  ३२ कोटी लोकांना अद्याप लसच देण्यात आलेली नाही. जागतिक आकडेवारीनुसार  २० देशांच्या यादीत भारत लसीकरणात १९ व्या क्रमांकावर आहे. भारताची लसीकरणाची गती  गती खूप धिमी आहे.अन्य लसींना परवानगी का नाही?सरकारने जगातील अन्य लसीला का परवानगी दिली नाही? बालकांसाठीच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसचे काय झाले? १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची निभावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली पाहिजे, केंद्र सरकारची नाही. हे सरकार दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय स्वत:कडे ओढून घेत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या