शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:16 IST

या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे.

नवी दिल्ली : देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,०६७ रुग्ण आढळले; तर ४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या दुप्पट आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. मंगळवारी १,२४७ नवे रुग्ण आढळले होते व एकाचा मृत्यू झाला होता. 

या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल, असे प्राधिकरणाने बुधवारच्या बैठकीत म्हटले. प्राधिकरणाने संपूर्ण शहरात आक्रमकपणे चाचण्या करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, कोरोना आणखीही लांबणार असेल तर आम्ही कोरोनासोबत जगण्याचे शिकले पाहिजे. रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर कारवाई करू.

शांघायमध्ये घेतला सात जणांचा बळी-  बीजिंग : चीनचे व्यावसायिक शहर शांघायमध्ये कोविड-१९ मुळे आणखी सातजणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ झाली आहे. दिलासा म्हणजे नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे, असे आरोग्य आयोगाने म्हटले.

- २,७५३ नवे रुग्णबीजिंगमध्ये मंगळवारी आढळले. - २,४९४ हे त्यांत एकट्या शांघायमधील होते.- १७,१६६ जण देशात कोरोनाची लक्षणे नसलेले आढळले. यांतील बहुसंख्य हे शांघायमधील आहेत. शांघायची लोकसंख्या २६ दशलक्ष आहे. -  ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत चालल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शांघायमध्ये लॉकडाऊन लागू केला गेला आहे. -  डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,६५५ झाली आहे. देशात सध्या ३०,७७३ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली