शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशात झपाट्याने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; बळी ६ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:08 IST

एकूण संख्या २ लाख २० हजारांवर; ४८% बळी महाराष्ट्रातील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २० हजारांपर्यंत पोहोचली असून, या आजाराला बळी पडलेल्यांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे.आतापर्यंत देशामध्ये दरदिवशी कोरोनाचे चार किंवा पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. गेल्या १५ दिवसांत त्यात अधिक वाढ होत गेली आणि गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले.

देशात बुधवारी कोरोनामुळे २६० हून अधिक लोकांचा बळी गेला. एकट्या महाराष्ट्रामध्ये १२२ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण बळींपैकी ४८ टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीमध्ये बुधवारी ५०, तर गुजरातमध्ये तीस जणांचा या साथीने बळी गेला. कोरोना रुग्णांपैकी १ लाखांहून अधिक लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी आणखी १,५२३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दिल्लीत ६०० पेक्षा जास्त लोक बळी पडले आहेत.

दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या, त्यांची स्थिती व रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या आदी तपशील जाणून घेण्यासाठी दिल्ली कोरोना हे अ‍ॅप विकसित केले आहे. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी २५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना रुग्णांचा २५ हजारांचा टप्पा करणारे तामिळनाडू हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. गुजरातमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार झाला आहे.रेमडिसिव्हिरबद्दलच्या निर्णयाचे स्वागतप्रकृती चिंताजनक असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास भारताने परवानगी दिली आहे. गिलिड सायन्सेस या कंपनीतर्फे हे औषध बनविण्यात येते. कोरोना रुग्णांवर केलेल्या चाचण्यांत रेमडिसिव्हिर औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे निदर्शनास आले होते. रेमडिसिव्हिरचा समावेश केल्याने भारतात कोरोना प्रतिबंधक उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.77,793राज्यात कोरोना रुग्णमुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात २ हजार ९३३ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात १२३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७७ हजार ७९३ झाली असून, बळींचा आकडा २ हजार ७१० झाला आहे. दिवसभरात १ हजार ३५२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के झाले असून, मृत्यूदर ३.४८ टक्के एवढा आहे.रशिया, भारतात वाढत आहेत रुग्णकोरोनाचे सर्वाधिक म्हणजे १९ लाखांहून अधिक रुग्ण अमेरिकेत असले तरी रशिया, भारत व इराणमध्ये आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगात ६६ लाखांहून अधिक रुग्ण असले तरी त्यातील ३२ लाख बरे झाले आहेत आणि ३५ लाख ८५ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ३ लाख ८९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या