शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Parliament: मोठी बातमी! संसदेतील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 13:22 IST

Corona in Parliament: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोठी माहिती समोर आली आहे. 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेतील 1,409 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 400 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता या कोरोना संसर्गसंसद भवनातही पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत काम करणाऱ्या किमान 400 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 ते 7 जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.

400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी 400 हून अधिक संसद कर्मचारी सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेच्या 1,409 कर्मचाऱ्यांपैकी 402 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

अनेक अधिकारी आयसोलेशनमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे 200, राज्यसभेचे 69 आणि 133 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेले लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही आयसोलेशनमध्ये आहेत.

दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये वाढ

दिल्लीत शनिवारी 20,181 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली. यासह 11,869 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 7 जणांचा मृत्यू झाला. यासह दिल्लीत कोरोनाचे एकूण 1,526,979 प्रकरणे आहेत. चिंताजनक म्हणजे, दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांनी वाढून 19.6 वर पोहोचला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात साप्ताहिक कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू राहणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनParliamentसंसद