शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:04 IST

आयसीएमआर; लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने अभ्यास

ठळक मुद्देआयसीएमआरने लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने हा अभ्यास केला. भारतात फेब्रुवारीच्या मध्याला कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तर पहिली लाट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण  असण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ॲाफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत असून तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच तसेच डेल्टा प्लस विषाणूचे ४८ रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष हाती आले आहेत.

आयसीएमआरने लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने हा अभ्यास केला. भारतात फेब्रुवारीच्या मध्याला कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तर पहिली लाट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली होती. या दोन लाटांनी आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता. तिसऱ्या लाटेमुळे आणखी हाहाकार माजू शकतो असे चित्र काही जणांकडून उभे करण्यात येत होते.आयसीएमआरने गणिती प्रारुपांच्या आधारे कोरोना साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित एक लेख इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट कोणत्या कारणांमुळे येऊ शकते याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. 

लसीकरण, लॉकडाऊन ठरेल प्रभावीआयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने राबविल्यास, तसेच लॉकडाऊनसारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत मिळणार आहे.

देशात ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण

गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले आहेत तर ११८३ जण मरण पावले. उपचार घेणाऱ्यांचा आकडा ८६ दिवसांनंतर सहा लाखांच्या खाली घसरला आहे. आतापर्यंत ४० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

जगभरात १८ कोटी १२ लाख कोरोना रुग्णांपैकी १६ कोटी ५८ लाख जण बरे झाले तर १ कोटी १४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत ३ कोटी ४४ लाखांपैकी २ कोटी ९१ लाख लोक कोरोनामुक्त झाले. तिथे ६ लाख १९ हजार लोकांचा या संसर्गाने मृत्यू झाला.

n    केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ४८ हजार ६९८ नवे रुग्ण आढळले व मृत्यूंची आकडेवारी ३ लाख ९४ हजार ४९३ झाली आहे. ३ कोटी १ लाख ८३ हजार १४ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ जण बरे झाले.n    सध्या ५ लाख ९५ हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ८६ दिवसांतले हे सर्वात कमी प्रमाण असून, ते एकूण रुग्णांच्या तुलनेत सहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात दररोजचा संसर्ग दर २.७९ टक्के असून, तो सलग १९ व्या दिवशी ५ टक्क्यांच्या खाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या