शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 12:19 IST

Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: 3 जानेवारी म्हणजेच आजपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. रविवारपर्यंत लसीकरणासाठी CoWIN अॅपवर 12 लाखांहून अधिक नोंदणी करण्यात आली, तर 4.52 लाखांहून अधिक मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, मुलांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर स्वतंत्र लाइन, वेगळी वेळ आणि स्वतंत्र लसीकरण पथक तयार करण्याचे प्रयत्न आहेत.

राज्यांना सूचना जारीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 27 डिसेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ 15 ते 18 वयोगटातील मुलांनाच लसीकरण केले जाईल. मांडविया यांनी लसीकरण कार्यक्रम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्यांचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी ऑनलाइन बैठक घेतली.

12 लाख नोंदणीबालकांच्या लसीकरणाच्या नोंदणीचा ​​कार्यक्रम शनिवारपासून सुरू झाला. सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोविन अॅपवर आधीच तयार केलेले खाते किंवा नवीन खाते तयार करुन नोंदणी केली जाऊ शकते. याशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येणार होती. रविवारी रात्रीपर्यंत 15 ते 18 वयोगटातील 12 लाखांहू अधिक मुलांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.

25 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी घोषणा केली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. सध्या देशात 15-18 वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. जगातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांना आधीच लसीकरण केले जात आहे.

मुलांसाठी लस महत्वाचीयूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, कोरोना लस मुलांना कोविड-19 ची लागण होण्यापासून रोखण्यास मदत करते. कोरोना लस गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि मुलांमधील मृत्यूचा धोका कमी करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 च्या उच्च जोखीम गटातील मुलांसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह किंवा दम्याने ग्रस्त मुले, ज्यांना कोविड-19 पासून गंभीर आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो, त्यांच्यासाठीही आवश्यक आहे.कोविड-19 ची जास्त लागण झालेल्या भागात राहणाऱ्या मुलांसाठीही लसीकरण आवश्यक आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन