- विकास झाडे नवी दिल्ली : कोरोनाच्या विळख्यात यंदा शेतातील काडीकचºयाचे (धसकट) प्रदूषण जीवघेणे ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते काडीकचºयामुळे होणारे प्रदूषण आणि कोरोना विषाणू या दोघांचाही थेट हल्ला फुफ्फुसावर होतो. यंदा या दोन्हीच्या कचाट्यात सापडल्यास या काळातील मृत्युदरातही वाढ होऊ शकते, त्यामुळे प्रत्येकाला अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे.आॅक्टोबरपासून राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत मोठ्या प्रमाणात काडीकचरा जाळण्यात येतो. धुरांचे लोट हवेत पसरल्याने काही दिवस आकाशात धुरांचे ढग निर्माण होतात. त्यामुळे दिल्लीतील हवेतील प्रदूषणाची पातळी अनेक भागांत १००० पेक्षा अधिक जाते. १५० च्या वर हवेतील प्रदूषण आरोग्यास हानिकारक आहे.केजरीवाल यांनी सोमवारी ‘अॅन्टी स्मॉग गन’ उपक्रमाचा शुभारंभ केला. दिल्लीत सर्वत्र ही संयंत्रे बसविली जाणार आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीत शेतावर बायो डीकॉम्पोजरचे द्रावण फवारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काडीकचºयाचे तण विरघळतील.मृत्यूचे प्रमाण अधिककोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर परिणाम करतो, तर, हवा प्रदूषणही फुफ्फुसावर आघात करतात. साहजिकच लहान मुले आणि वृद्ध, तसेच विविध आजारांनी ग्रस्त यांच्यात कोरोनाचा धोका वाढतो. त्यामुळे प्रदूषित शहरांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर अधिक राहणे स्वाभाविक आहे.- डॉ. अजय नागपुरे, पर्यावरणावर काम करणाºया जागतिक रिसोर्स संस्थेतील शास्त्रज्ञलातूर, मुंबई, नागपूर प्रदूषितवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, दिल्ली-एनसीआरमधील गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम हे पहिल्या दहामध्ये आहेत.मुंबई, पुणे ही शहरे मागे नाहीत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील नऊ प्रदूषित शहरांमध्ये लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे.गडकरींचा इथेनॉल प्रयोगदिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन वर्षांपूर्वीच पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सोबत घेऊन पंजाब, हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांसोबत सामंजस्य करार केला.या करारानुसार काडीकचºयापासून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार होती. गडकरींच्या प्रयत्नातून याला थोडे यश आले; परंतु हे प्रयोग अगदी क्षुल्लक प्रमाणात होऊ शकले.
कोरोनामुळे शेतातील काडीकचऱ्याचे प्रदूषण जीवघेणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 01:49 IST