नवी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगण आणि ओडिशा या चार नक्षलप्रभावित राज्यांची बैठक झाली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग या बैठकीला उपस्थित होते़ तथापि तेलंगण आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव यांची यावेळी उपस्थिती होती़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, सुरेश प्रभू आदी उपस्थित होते़ या बैठकीत संबंधित राज्यांनी पायाभूत विकास योजनांसाठीच्या निधी वाटपाबाबत तक्रारीचा सूर लावला़ केंद्रीय मंत्र्यांनी या राज्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नक्षलविरोधी मोहिमेत राज्यांना सहकार्य -केंद्र
By admin | Updated: February 10, 2015 03:53 IST