गोवा इंटर नॅशनल सेंटरमध्ये रंगले कोंकणी कवी संमेलन
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पणजी : गोवा इंटर नॅशनल सेंटरमध्ये कोंकणी युवक संघ व गोवा इंटरनॅशनल सेंटर आयोजित उत्तेजन या कार्यक्रमात कोंकणी कविता संमेलन रंगले.
गोवा इंटर नॅशनल सेंटरमध्ये रंगले कोंकणी कवी संमेलन
पणजी : गोवा इंटर नॅशनल सेंटरमध्ये कोंकणी युवक संघ व गोवा इंटरनॅशनल सेंटर आयोजित उत्तेजन या कार्यक्रमात कोंकणी कविता संमेलन रंगले. सुफला गायतोंडे यांनी संचलित केलेल्या या कवी संमेलनात गोव्यातील नवोदित तथा नामवंत कवींनी सहभाग घेतला. रार्जशी सैल, बाबुराव पाटील, नेसियो डिसौझा, विवेक पिसुर्लेकर, सरस्वती नायक, अपुर्वा गायतोंडे, सुनिल पालकर, शेखर नायक, त्रिझा फेरेरा, सुभाष शहा, सोनिया शहा, सुरेश कामत, आग्नेलो रिबेलो, प्रज्योत वेर्लेकर, सुरेश नायक, विशाल गांवकर, सिद्धेश तारी, सुविना पालकर, अशोक लोटलीकर यांनी कवितांचे सादरीकरण केले.एन. शिवदास यांनी स्वागत केले, तर गायतोंडे यांनी आभार मानले.