शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोनच्या वक्तव्यावरून वादंग; सरकारने व्यक्त केली तीव्र नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:08 IST

व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला

संतोष ठाकूर नवी दिल्ली : व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून, त्याबाबत सरकारने नापसंती व्यक्त केल्यानंतर निक रिड यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून माफी मागितल्याचे वृत्त आहे. बातम्यांमध्ये आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा खुलासा रिड यांनी केल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात रिड यांनी म्हटले आहे की, कंपनीसाठी भारत हा मोठा बाजार आहे. येथे मोठी गुंतवणूक केली आहे. यापुढेही भारतासोबतचे संबंध कंपनी कायम ठेवील.सदर प्रतिनिधीने कंपनीला संपर्क परंतु हे वृत्त लिहून होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. आयडिया-व्होडाफोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी कंपनीचे प्रमुख आदित्य बिर्ला यांच्या वतीने दूरसंचारमंत्री प्रसाद यांच्याशी थेट बोलणे होईल. कंपनीकडून कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले जाणार नाही.रिड यांनी पत्रात लिहिले की, माध्यमांमध्ये आलेले आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दिले आहे. ते आमच्या विचारांचे प्रतिनिधत्व करीत नाही. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. येत्या सप्ताहात आपण स्वत: भारत सरकारशी संपर्क करू. दूरसंचार क्षेत्राच्या वाईट स्थितीवर उपाय शोधण्यासाठी सचिवांचा समूह स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. हे एक गंभीर पाऊल आहे. यातून मदत पॅकेजबाबत काही तरी सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला आशा वाटते.>व्यावसायिक क्षेत्रात खळबळनिक रिड यांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तात म्हटले होते की, ‘व्होडाफोन भारतातील व्यवसाय बंद करू शकते. यास सरकारची धोरणेही जबाबदार आहेत. रिड यांच्या या वक्तव्याने व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दूरसंचार मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेऊन आयडिया-व्होडाफोनकडून खुलासा मागविला होता. जिओच्या आगमनानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा जीवघेणी झाली असून, तिचा सामना करण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांनी विलीनीकरण करून एकच कंपनी स्थापन केली आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन