शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"26/11 हल्ला पाक अन् यूपीए सरकारच्या संगनमतानंच, हिंदू दहशतवादी संकल्पना काँग्रेसचीच" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 11:33 IST

गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्लीः गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मुंबईवरच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमतानं झाल्याचा गंभीर आरोप मणी यांनी केला आहे. कारण त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील जास्त करून अधिकारी दहशतवादावर होणाऱ्या वार्षिक गृह सचिवस्तरावरच्या चर्चेसाठी इस्लामाबादला होते. ही चर्चा 25/11/2008ला पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु तिथे गेल्यानंतर ती तारीख वाढवून 26/11 करण्यात आली. त्यावेळी मला लखनऊला पाठवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान मध्यरात्री हा हल्ला झाला.ते म्हणाले, हिंदू दहशतवाद ही एक जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्यावेळच्या केंद्र सरकारमधील काही मोठे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून पसरवली होती. त्यानंतर त्याचे पुरावे शोधण्यात आले. केंद्र सरकारचा काय उद्देश होता ते माहीत नाही. पण त्यामुळे खरे दहशतवादी पळून गेले. मणी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं पुस्तक 'हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर'च्या प्रकाशनादरम्यान हे विधान केलं आहे. त्यांच्या पुस्तकातील भगवा दहशतवाद एक षडयंत्र यावर एक चर्चासत्र झालं. 

चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, मी काही राजकीय व्यक्ती नाही आणि पुस्तक प्रकाशनासाठी भोपाळला आलो आहे. याच दरम्यान 'द ग्रेट इंडियन कांस्पिरेसी' आणि  'आतंक से समझौता'चे लेखक आणि पत्रकार प्रवीण तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांवर हिंदू दहशतवाद संकल्पना रुजवण्याचा आरोप केला होता. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या गळ्यात हिंदू धर्माचे लॉकेट घालण्यात आले होते, याची वाच्यता अमेरिकेनं पकडलेला दहशतवादी डेव्हिड हेडलीनं केली होती. जर कसाबला जिवंत पकडलं नसतं, तर सर्व दहशतवादी हिंदू घोषित करण्यात आले असते, हे एक षडयंत्र होतं, ते यशस्वी झालं नाही, असा आरोपही प्रवीण तिवारी यांनी केला आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला