शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकार्‍यांविरोधात ठेकेदारांचे काम बंद

By admin | Updated: July 10, 2015 00:32 IST

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेली कामे पुन:श्च ठप्प झाली असून, सुरळीत सुरू असलेली कामे एकाएकी थांबविण्यात आली आहेत. महसूल वसूल करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा सिंहस्थानिमित्त काम करणार्‍या ठेकेदारांना अडसर होत असल्याने ठेकेदारांनी काम बंद केले आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथील सर्वच कामे अंतिम टप्प्यात असून, सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत आहेत. प्रांताधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्यासाठी ११ जुलै ही अंतिम तारखी दिली आहे. म्हणजे सिंहस्थ पर्वकालाच्या अगोदर (१४ जुलै) रोजी कामे पूर्ण करायची आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. एकीकडे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कामे पूर्ण करावयास सांगतात तर साइटवरून दुसर्‍या साइटवर वाळू वाहतूक करताना तलाठी, सर्कल किंवा नायब तहसीलदार

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेली कामे पुन:श्च ठप्प झाली असून, सुरळीत सुरू असलेली कामे एकाएकी थांबविण्यात आली आहेत. महसूल वसूल करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा सिंहस्थानिमित्त काम करणार्‍या ठेकेदारांना अडसर होत असल्याने ठेकेदारांनी काम बंद केले आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथील सर्वच कामे अंतिम टप्प्यात असून, सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत आहेत. प्रांताधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्यासाठी ११ जुलै ही अंतिम तारखी दिली आहे. म्हणजे सिंहस्थ पर्वकालाच्या अगोदर (१४ जुलै) रोजी कामे पूर्ण करायची आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. एकीकडे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कामे पूर्ण करावयास सांगतात तर साइटवरून दुसर्‍या साइटवर वाळू वाहतूक करताना तलाठी, सर्कल किंवा नायब तहसीलदार वाळूचे ट्रॅक्टर या वाहनांना ३५०० - ७० हजारपर्यंत दंडाची रक्कम सांगतात. नाइलाजाने ठेकेदारांनी कामे बंद केली आहेत. परिणामी ११ जुलैपर्यंत कामे पूर्ण होणे अशक्य आहे. ठेकेदार म्हणतात, आम्ही गावात वाळू आणतच नाहीत. गल्लीबोळातील कामे करण्यासाठी साठा करू शकत नाही. यासाठी अन्यत्र ठिकाणाहून (गावातल्या गावात) साइटवर वाळू ट्रॅक्टरद्वारे नेत असतो. मात्र महसूलवाल्यांनी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम हाती घेतल्याने कामे बंद केल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही. त्यात वाळू वाहतूकदारांनी अचानक संप पुकारून ठेकेदारांची कोंडी केली आहे. ठेकेदारांकडे वाळू येण्यास मार्गच उरला नाही.येत्या काही दिवसाात साधुग्राममधील जागेतील जागा मागणार्‍या इच्छुकांना गाळे वाटप होणार आहे.या धामधुमीत ठेकेदारांना प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. ११ जुलै रोजी स‘ाद्री वाहिनीतर्फे त्र्यंबक शहराचे चित्रीकरण करण्यात येणार असून, १३ जुलै रोजी प्रसारण होणार आहे. तत्पूर्वी कामे पूर्ण होणे, साफसफाई स्वच्छता होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.साधुग्राममधील गाळ्यांचे वितरण लवकरचत्र्यंबकेश्वर येथील साधुग्राममधील गाळ्यांचे वितरण लवकरच होणार आहे. साधू-महंत, महामंडलेश्वर ठिकठिकाणचे आश्रम सेवाभावी संस्थांचे ग्रुपकडून गाळे मागण्यांचे अर्ज आलेले आहेत. एकूण १३ एकर जागेतील ५८ गाळ्यांचे वाटप होणार असून गाळे वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध होणार आहेत. काही गाळे ३०० चौ.मीटर तर काही गाळे २४० चौ.मीटर आहेत. मागील वेळेस साधुग्राममध्ये अनेक गाळे रिकामे होते. तर फक्त १५ गाळे गेले होते. याच पार्श्वभूमीवर यावेळेस गाळे असतील.