शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाचा फटका; सण-उत्सवकाळातील खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:53 IST

३३ टक्के कुटुंबांकडून कोणतीही खरेदी नाही

मुंबई : कोरोना संकटाच्या सावटाखाली देशात दसरा, दिवाळी आणि नवरात्रौत्सव साजरे झाले. दरवर्षी या उत्सवकाळात घराघरांत खरेदीची लगबग असते. परंतु, यंदा देशातील जवळपास ३३ टक्के कुटुंबांनी या कालावधीत कोणतीही खरेदी केली नसल्याची माहिती लोकल सर्कल या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या सर्वेक्षणातून हाती आली आहे. ३७ टक्के लोकांनी एक ते दहा हजार रुपये, २० टक्के लोकांनी १० ते ५० हजार रुपये खर्च केले. तर, ५० हजारांपेक्षा जास्त खर्च करणाऱ्यांची संख्या ९ टक्के आहे. ग्राहकांची मानसिकता समजून घेण्यासाठी लोकल सर्कलने हे सर्वेक्षण केले होते. देशातील ३०२ जिल्ह्यांतल्या सुमारे ४४ हजार जणांनी त्यावर आपली मते नोंदवली आहेत. त्यात ६२ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांचा समावेश आहे. ५५ टक्के लोक हे मोठ्या शहरांतील असल्याचे लोकल सर्कलने स्पष्ट केले आहे. पुढच्या चार महिन्यांतही अवास्तव खर्च करणार नसल्याचे ४४ टक्के लोकांनी सांगितले आहे. काेराेना काळात अनेकांना नाेकरी गमवावी लागली. काही जणांचे पगार कमी झाले. हे संकट आणखी किती काळ आपल्या साेबत असेल, हे समजू न शकल्याने अनेकांनी काटकसरीचे धाेरण अवलंबले. या कालावधीत घरांची दुरूस्ती आणि रंगरंगोटीवरील खर्चाला प्राधान्य असेल असे ३५ टक्के लोकांनी सांगितले आहे. त्याखालोखाल घरात आवश्यक असलेली उपकरणे, स्मार्ट फोन, खरेदी करण्याची अनेकांची मनीषा आहे. मालमत्ता, वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न असेल, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे २ आणि सात टक्के आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत मासिक उत्पन्न घटल्याची कबुली सर्वेक्षणात दिली आहे.’ बचतही घटली कोरोना संकटामुळे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून २८ टक्के कुटुंबांनी आपली बचत ५० टक्क्यांनी घटल्याची कबुली दिली आहे.  ही घट २५ ते ५० टक्के असल्याचे १५ टक्के लाकांचे म्हणणे असून ० ते २५ टक्के घट झालेल्या लोकांचे प्रमाण २५ टक्के आहे.  तर, बचतीवर कोणताही परिणाम झाला नाही हे सांगणाऱ्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. उर्वरित १० टक्के लोकांनी बचत वाढल्याचे उत्तर दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या