शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र निवडणुकांसाठी घटनादुरुस्ती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:28 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी राज्यघटनेच्या पाच कलमांमध्ये, विशेषत: जी कलमे लोकसभा, विधानसभेचा कालावधी व विसर्जनाशी संबंधित आहेत

नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी राज्यघटनेच्या पाच कलमांमध्ये, विशेषत: जी कलमे लोकसभा, विधानसभेचा कालावधी व विसर्जनाशी संबंधित आहेत, त्यांत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानंतरच हा विचार प्रत्यक्षात येऊ शकेल, असे मत निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा व न्याय खात्याला कळविले आहे.लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात असा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी अलिकडेच केलेल्या अभिभाषणात देखील या मुद्द्याचा उल्लेख होता.एकाच वेळी या निवडणुका घेता येतील का, याविषयी केंद्रीय कायदा व न्याय खात्याने निवडणुक आयोगाचा सल्ला मागितला होता. या विचाराला निवडणूक आयोगाने पाठिंबा दर्शविला असता, तरी तो प्रत्यक्षात येण्यातील अडथळेही विषद केले आहेत. कायदा खात्याने याबद्दलचे एक टिपण नुकतेच तयार केले आहे.लोकसभा निवडणुकांबरोबर निवडणुका घेण्यासाठी विधानसभेचा कालावधी वाढविता किंवा कमी करता येऊ शकतो, असे मतसर्वोच्च न्यायालयानेही पूर्वी व्यक्त केले होते. संसदेच्या दोन्हीसभागृहांचा कालावधी राज्यघटनेच्या ८३ व्या कलमाद्वारे ठरविण्यातआला आहे. दोन्ही निवडणुकाएकाच वेळी घ्यायच्या असल्यासया कलमात दुरुस्ती करावीलागेल.>राज्यांची संमती आवश्यकराष्ट्रपतींकडून लोकसभा विसर्जित केली जाते ती राज्यघटनेतील ८५ व्या कलमाच्या आधारे. त्याचप्रमाणे विधानसभेचा कालावधी राज्यघटनेच्या १७२ व्या कलमातील तरतुदींनुसार ठरविला गेला आहे.३५६ व १७४ ही कलमे विधानसभा विसर्जित करण्याशी संबंधित आहेत. या पाचही कलमांमध्ये योग्य दुरुस्ती केल्यानंतरच लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य होईल. या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणे आवश्यकच आहेच.परंतु भारतात संघराज्यपद्धती असल्याने एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या झाल्यास या गोष्टीला सर्व राज्यांच्या सरकारांनी संमती देणे आवश्यक आहे असेही केंद्रीय विधी खात्याने तयार केलेल्या टिपणात म्हटले आहे.