शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसणाऱ्या प्रवाशास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 04:46 IST

इटलीमधील मिलान येथून २०० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने दांडगाई करत वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

नवी दिल्ली : इटलीमधील मिलान येथून २०० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने दांडगाई करत वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले.एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी रात्री या विमानाने मिलान येथून रात्री ९ वाजता उड्डाण केले. त्यानंतर थोड्याच वेळात ३२ सी क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या गुरप्रीत सिंग या प्रवाशाने ‘कॉकपिट’मध्ये जाण्यासाठी दंगामस्ती सुरू केली. समजूत घालूनही तो ऐकत नाही असे दिसल्यावर सुरक्षेच्या कारणाने वैमानिकाने विमान पुन्हा मिलानला नेण्याचे ठरविले. मात्र सलग आठ तासांच्या प्रवासाला पुरावे यासाठी इंधनाची टाकी उड्डाणापूर्वी ‘फूल’ केली होती. विमान अनपेक्षितपणे माघारी वळवल्याने ते सुरक्षित उतरविता यावे यासाठी वैमानिकाने टाकीतील थोडे इंधन कमी केले. तासाभराने ते मिलान येथे पुन्हा उतरल्यानंतर दांडगट प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन करून अडीच तासांच्या विलंबाने विमान दिल्लीकडे पुन्हा निघाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Arrestअटक