नरखेड ते सोलापूर सिटीबसचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 22:26 IST
नरखेड : सोलापूर महापालिकेच्या नरखेड ते सोलापूर नवीन व्हॉल्व्हो सिटीबस गाडीचा शुभारंभ नरखेड येथे करण्यात आला़
नरखेड ते सोलापूर सिटीबसचा शुभारंभ
नरखेड : सोलापूर महापालिकेच्या नरखेड ते सोलापूर नवीन व्हॉल्व्हो सिटीबस गाडीचा शुभारंभ नरखेड येथे करण्यात आला़ ही बससेवा सोलापूर ते नरखेड मोहोळमार्गे दिवसातून तीनवेळा धावणार आहे़ मुबलक प्रवासी मिळाल्यास या बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याची माहिती एस़पी़शिरवाळ यांनी दिली़ यावेळी ज्येष्ठ नागरिक शंकरराव पाटील, सुरेश पाटील, डॉ़ वसंतराव लवंगे, विनायक पाटील, सुरेश पाटील, महादेव लामगुंडे, प्रवीण पाटील, सुरेश मोटे, कल्याण पवार, किरण साळुुंखे, हणमंत खंदारे, विक्रम साठे, दादासाहेब राऊत, मधुकर सुतार आदी उपस्थित होते़