शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

येचुरींचा मसुदा फेटाळल्याने ‘माकप’मधील मतभेद तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:20 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) अलिकडच्या काळातील इतिहासात एक अभूतपूर्व घटना . माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पक्षाच्या राजकीय स्थिती व भवितव्याविषयी सादर केलेला प्रस्तावाचा मसुदा पक्षाच्या मध्यवर्ती समितीने फेटाळून लावला. समितीच्या तीन दिवसीय बैठकीत हा निर्णय झाला.

कोलकाता : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) अलिकडच्या काळातील इतिहासात एक अभूतपूर्व घटना . माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पक्षाच्या राजकीय स्थिती व भवितव्याविषयी सादर केलेला प्रस्तावाचा मसुदा पक्षाच्या मध्यवर्ती समितीने फेटाळून लावला. समितीच्या तीन दिवसीय बैठकीत हा निर्णय झाला.केंद्रीय समितीने येचुरी यांचा अहवाल ५५ विरुद्ध ३१ मतांनी फेटाळून लावण्यात आला. त्याला पर्याय म्हणून माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात व एस. रामचंद्रन यांनी पक्षाच्या राजकीय स्थितीविषयी तयार केलेला अहवाल मध्यवर्ती समितीने स्वीकारला. दर तीन वर्षांनी माकपचे राष्ट्रीय अधिवेशन भरते. ते येत्या एप्रिलमध्ये हैदराबाद येथे होणार असून त्यात करात व एस. रामचंद्रन यांच्या अहवालावर आता मंथन होईल. या घटनेमुळे माकपमधील सीताराम येचुरी व प्रकाश करात या दोन गटांमधील मतभेद आणखी तीव्र होणार आहेत. २०१९मधील लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेस पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी याबाबत करात व येचुरी यांची मते भिन्न आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायला हवा यावर करात व येचुरी यांचे एकमत असले तरी त्यासाठी वापरायच्या मार्गांबाबत दोघांतही एकवाक्यता नाही. सीताराम येचुरी यांनी मध्यवर्ती समितीमध्ये सादर केलेल्या अहवालात म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे ही गोष्ट महत्वाची असली तरी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही सत्ताकांक्षी पक्षाबरोबर युती करु नये. हे मत व्यक्त करताना येचुरी यांनी काँग्रेसचे नाव घेण्याचे टाळलेले आहे. पण त्याचबरोबर समझोता हा शब्द वापरणे टाळले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा-प्रकाश करात यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी माकपने काँग्रेसशी निवडणूक समझोता किंवा युती न करता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा.