शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

संमतीचे रोमँटिक संबंध गुन्हा ठरविण्याचा उद्देश नाही, पॉक्सो कायद्यावर दिल्ली हायकोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 09:11 IST

Court: लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे  संरक्षण (पॉक्सो) कायद्याचा हेतू अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा आहे.  तरुण प्रौढांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्याचा नाही,  असे मत दिल्ली हायकोर्टाने एका मुलाला जामीन देताना व्यक्त   केले आहे. 

- डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे  संरक्षण (पॉक्सो) कायद्याचा हेतू अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा आहे.  तरुण प्रौढांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्याचा नाही,  असे मत दिल्ली हायकोर्टाने एका मुलाला जामीन देताना व्यक्त   केले आहे. जून २०२१ मध्ये १७ वर्षांच्या मुलीचे तिच्या कुटुंबीयांनी एका पुरुषाशी लग्न केले. परंतु तिला त्याच्यासोबत राहायचे नव्हते. ऑक्टोबर २०२१ मध्ये ती  मित्राच्या घरी गेली आणि त्याला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. ती त्याला पंजाबला घेऊन गेली. तिथे त्यांनी लग्न केले. तिच्या वडिलांनी मुलीच्या पतीविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविला.मुलीने यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेऊन पालकांकडून संरक्षण मागितले. या गुन्ह्यांत मुलाला डिसेंबर २०२१ मध्ये अटक झाली  आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता. हायकोर्टाने चेंबरमध्ये मुलीशी संवाद साधला. तिने न्यायमूर्तींना सांगितले की, तिने  मित्राशी तिच्या इच्छेने लग्न केले आहे. तिच्यावर  कोणीही जबरदस्ती केली नव्हती.  तिला आजही त्याच्यासोबत राहायचे आहे.हायकोर्टाने म्हटले  की, अल्पवयीन व्यक्तीच्या संमतीला कायदेशीर आधार नसला तरी जामीन देताना प्रेमातून निर्माण झालेल्या संमतीच्या नातेसंबंधाची वस्तुस्थिती विचारात घेतली पाहिजे. मुलीला मुलाशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली गेली असे हे प्रकरण नाही. पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून  मुलाला  तुरुंगात राहू दिल्यास न्यायाचा विपर्यास होईल. सद्यःपरिस्थितीत मुलाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे.

पॉक्सो कायदा १८ वर्षांखालील मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी बनविला आहे. तरुण प्रौढांमधील सहमतीपूर्ण रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्याचा कायद्याचा हेतू कधीही नव्हता.- जसमित सिंह, न्यायमूर्ती, दिल्ली उच्च न्यायालय

यापूर्वीचे निर्णय असे बालकांच्या शोषणाला बळी पडलेल्यांना संरक्षण आणि न्याय देण्यासाठी जो कायदा बनला आहे, तो काही घटकांच्या हातातील गैरवापराचे  साधन बनू शकतो. (२०२१ मध्ये विजयालक्ष्मीविरुद्ध राज्य प्रकरणात मद्रास हायकोर्ट)आरोपी आणि अल्पवयीन पीडित यांच्यातील परस्पर सहमतीचे  शारीरिक संबंध विचारात घेता, जामीन मंजूर केला जाऊ शकतो. (२०२० मध्ये धर्मेंद्र सिंग विरुद्ध राज्यमध्ये दिल्ली उच्च न्यायालय)

टॅग्स :Courtन्यायालय