शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

काँग्रेसचे विश्वेश्वर रेड्डी सर्वांत श्रीमंत उमेदवार, तेलंगणातून भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:35 IST

काँग्रेसने तेलंगणातील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची कौटुंबिक संपत्ती ८९५ कोटी रुपये इतकी आहे.

हैदराबाद : काँग्रेसने तेलंगणातील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची कौटुंबिक संपत्ती ८९५ कोटी रुपये इतकी आहे.अनेक पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायची आहे. ती आल्यानंतर रेड्डी यांच्यापेक्षा आणखी कोणी श्रीमंत आहे का, हे स्पष्ट होईल. रेड्डी यांची जंगम मालमत्ता २२३ कोटी रुपयांची आहे. त्यांच्या पत्नी के. संगीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटलच्या सहव्यवस्थापकीय संचालक असून, त्यांची जंगम मालमत्ता ६१३ कोटी रुपयांची आहे. त्यांच्या दोन मुलांची जंगम मालमत्ता २0 कोटींची आहे. विश्वेश्वर रेड्डी व त्यांच्या पत्नी यांच्या नावाने स्थावर मालमत्ता अनुक्रमे २६ कोटी व १ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. आंध्रातील मंत्री पी. नारायण हे नारायण ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे मालक असून, त्यांची कौटुंबिक मालमत्ता ६६७ कोटींची आहे. त्यांनी नेल्लोरमधून विधानसभेसाठी काल अर्ज भरला. (वृत्तसंस्था)चंद्राबाबू ५७४ कोटींचे मालक : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची कौटुंबिक मालमत्ता ५७४ कोटी रुपयांची आहे, तर त्यांचे विरोधक व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची कौटुंबिक मालमत्ता सुमारे ५00 कोटी रुपयांची आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelanganaतेलंगणा