शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेमुळे भाजपा सापडला खिंडीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 04:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे. गरिबी हटविण्यासाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेमुळे भाजपा पुरता खिंडीत सापडला आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, देशातील गरिबातील गरीब२० टक्के कुटुंबांना मदत पुरविणेव नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणेही न्याय योजनेची प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी, अंमलात आणलेला गब्बरसिंग टॅक्स म्हणजेच जीएसटी यामुळे देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. असंघटित क्षेत्राला या निर्णयांचा मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी गरिबांनाच लुबाडण्याचे काम केले आहे. त्यांना दिले मात्र काहीही नाही. मोदी यांनी देशातील शेतकरी, लघू व मध्यम उद्योजक यांचे कंबरडे मोडले असून आयाबहिणींच्या बचतीवरही डल्ला मारला आहे.राहुल गांधी म्हणाले की, न्याय योजना हा गरिबीवर केलेला अंतिम प्रहार असेल. ३.६ लाख कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते हे काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत पटणारे नाही. न्याय योजनेचा आराखडा तयार करण्याआधी अनेक अर्थतज्ज्ञांशी काँग्रेसने सल्लासमलत केली होती. खात्री पटल्यानंतरच या योजनेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याचा विचार पक्का झाला. ही लोकानुनयी योजना नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.फक्त उद्योगपतींनाच फायदाराहुल गांधी यांनी सांगितले की, मोदींच्या राजवटीत फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचाच फायदा झाला आहे. काँग्रेस मात्र या देशातील गरिबांच्या कल्याणाची भाषा करत आहे. त्यासाठीच न्याय योजनेची आखणी केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास न्याय योजनेची देशभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व लाभार्थी कुटुंबांना या योजनेत सामावून घेतले जाईल. जीएसटीचा जसा बोजवारा उडाला तसे न्याय योजनेचे होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल. तिच्या अंमलबजावणीतील त्रुटी वेळीच दूर करण्यात येतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक