शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींसाठी त्यानं केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 15:51 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यानं स्वतःला लटकवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यानं स्वतःला लटकवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयासमोरच तो आत्महत्या करत असल्याचं पाहून लोकांना धक्काच बसला. हा प्रकार पाहिल्यानंतर उपस्थित इतर काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी त्याला झाडावरून खाली उतरवलं. राहुल गांधींनी राजीनामा परत घ्यावा अन्यथा मी स्वतःला लटकवून घेऊन आत्महत्या करेल, अशी भावनाच त्यानं व्यक्त केली आहे.राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर तो परत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर दबाव बनवला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्तेही धरणं आंदोलनाला बसून राहुल गांधींनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये, असा सल्ला दिला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं.या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला होता. कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहचले तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही राहुल यांना राजीनामा देऊ नका असं सांगितले होते.तसेच तुम्ही अध्यक्ष नसाल तर कोण अध्यक्ष होणार? असा सवाल करत मनमोहन यांनी निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितले. त्यानंतरही राहुल गांधी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. त्यावर कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी मागील 5 वर्षात राहुल गांधी यांनीच नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे, असं सांगितले होते.