शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये काँग्रेसचा तंबू थंड! आदित्यनाथ सक्रिय; लोकसभा निवडणुकीसाठी अन्यांचीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:28 IST

राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा आळस झटकून कामाला लागेल आणि सत्तासंपादनाचे प्रयत्न सुरू करेल, अशी अजिबात शक्यता दिसत नाही. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमधील मरगळ कमी होण्याची चिन्हे नाहीत किंवा तसे प्रयत्नही त्या पक्षातले लोक करताना दिसत आहेत.

नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा आळस झटकून कामाला लागेल आणि सत्तासंपादनाचे प्रयत्न सुरू करेल, अशी अजिबात शक्यता दिसत नाही. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमधील मरगळ कमी होण्याची चिन्हे नाहीत किंवा तसे प्रयत्नही त्या पक्षातले लोक करताना दिसत आहेत.आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपा, समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांनी मात्र उत्तर प्रदेशात जोरदार तयारी सुरू केली आहे, पण काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उत्तर प्रदेशबाबत थंडपणे बसून आहेत, असे काँग्रेसच्या राज्यसभेतील एका सदस्याने खासगीत सांगितले.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभेवर निवडून येतात. मात्र काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते ज्या राज्यातून निवडून गेले आहेत तेथील काँग्रेसची संघटना फार खिळखिळी झाली आहे. दुसºया बाजूला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आश्वासने देण्याचा सपाटाच लावला आहे. संघ स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते यांना ब्लॉक स्तरावर अनेक जबाबदाºया सोपविण्यात येत आहेत. पण त्याची गांभीर्याने दखल घेऊ न काँग्रेस नेते व कार्यकर्ते काही करत आहेत, असे चित्र मात्र नाही.बसपा, सपा लागले कामालामायावती यांनी राज्याचा दौरा करून दलित मतदारांना पुन्हा पक्षाच्या जवळ आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सभाही घेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी येत्या ८ जानेवारीला पक्षनेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार, खासदार तसेच पराभूत उमेदवार तसेच महत्त्वाचे नेते सहभागी होतील. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश