शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत दलितांच्या संमेलनाची काँग्रेस करतेय जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:10 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यात दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसंमेलनाची जबाबदारी पक्षाचे नेते राजू यांच्याकडे आहे

शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यात दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे. संमेलनाची जबाबदारी पक्षाचे नेते राजू यांच्याकडे आहे. तरीही या संमेलनाचे मुख्य कर्ते करविते सॅम पित्रोदा असल्याचे सांगितले जाते. अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी यांची राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दलितांच्या मागण्यांचा समावेश करण्याचा मुद्दा होता व राहुल गांधी यांनीही दलितांचे हित अबाधित राखण्यासाठी काँग्रेस प्रत्येक पातळीवर तयार असल्याचे आश्वासनही दिले होते. राहुल गांधी यांनी दिलेल्या या आश्वासनानंतरच दलितांशी चर्चा केली जावी, असा पक्षाने निर्णय घेतला. जिग्नेश मेवानी यांनी या संमेलनासाठी दलितांच्या २० संघटनांची यादी दिली होती व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासही सांगितले होते. गुजरातेत दलित मतदार सात टक्क्यांपेक्षाही जास्त आहेत. काँग्रेस त्या सगळ्यांनाच आपल्यासोबत घ्यायच्या प्रयत्नात आहे. संमेलनात वेगवेगळ्या भागांतून १०० पेक्षा जास्त दलित नेते, बुद्धिजिवी, डॉक्टर्स आदींना बोलवायची योजना आहे. सॅम पित्रोदा या सगळ्यांशी संवाद साधतील व त्यात निर्माण होणाºया मुद्यांचा समावेश जाहीरनाम्यात करतील. संमेलनाची तारीख अजून निश्चित झालेली नाही; परंतु राहुल गांधी गुजरातहून परतल्यानंतर ती ठरवली जाईल, असे कळते. काँग्रेस दलित, ओबीसी, पाटीदार आणि मुस्लिमांना संघटित करून भाजपवर हल्ल्याच्या तयारीत आहे.