शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Rahul Gandhi : "तू नेहमीच माझा मित्र, मार्गदर्शक..."; प्रियंका गांधींनी राहुल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:30 IST

Priyanka Gandhi And Rahul Gandhi : प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लाडक्या भावासाठी खास पोस्ट केली आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी लाडक्या भावासाठी खास पोस्ट केली आहे. तू नेहमीच माझा मित्र आणि मार्गदर्शक आहेस असं म्हटलं आहे. राहुल गांधी आज ५४ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म १९ जून १९७० रोजी दिल्लीत झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंका गांधी यांनी त्यांचा राहुल यांच्यासोबतचा एका छान फोटो शेअर केला आहे. एका राजकीय कार्यक्रमाशी संबंधित हा फोटो असून यामध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना दिसत आहेत. "माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याचा जीवनाबद्दलचा अनोखा दृष्टीकोन, जग आणि प्रत्येक गोष्टींचा मार्ग उजळवतो. नेहमी माझा मित्र, माझा सहकारी, तार्किक मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि नेता. चमकत राहा. माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम" असं प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांप्रती तुमची अतूट बांधिलकी आणि लाखो न ऐकलेल्या आवाजांप्रती तुमची जबरदस्त करुणा हे गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करतात" असं म्हटलं आहे. 

"सत्याचा आरसा हातात धरून शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे मिशन"

"विविधतेत एकता, समरसता आणि करुणा ही काँग्रेस पक्षाची नीतिमत्ता तुमच्या सर्व कृतीतून दिसून येते, कारण तुम्ही सत्याचा आरसा हातात धरून शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे तुमचे मिशन सुरू ठेवत आहात. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा" असंही खरगे यांनी म्हटलं आहे. 

"उज्ज्वल भविष्यासाठी भारताची उज्ज्वल आशा"

केसी वेणुगोपाल यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "आमचे लाडके नेते राहुल गांधीजी यांना शुभेच्छा देणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांमध्ये मी स्वत: सामील होतो. राहुलजी हे भारतातील गरीब, वंचित आणि मागासलेल्या नागरिकांचे निर्विवाद नेते आहेत. ते आवाज नसलेल्या लोकांचा आवाज आहेत. दुर्बलांसाठी शक्तीचा स्तंभ, आपल्या राज्यघटनेचे रक्षक आहेत, न्यायाचे योद्धे आहेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी भारताची उज्ज्वल आशा आहेत" असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधी