शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...तर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील; सोनियांच्या पंतप्रधानांना ५ सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:53 IST

CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांचं पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली: कोरोनाचं संकट अधिकाधिक गहिरं होत चालल्यानं देशाच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळे कालच मोदी सरकारनं सर्व खासदारांसह राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी खर्चाला कात्री लावण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्या अनुषंगानं गांधींनी सरकारला काही शिफारशी केल्या आहेत.सरकारी उपक्रमांच्या सर्व जाहिराती २ वर्षांसाठी बंद करण्याची सूचना सोनिया गांधींनी केली आहे. यामध्ये त्यांनी वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईनला देण्यात येणाऱ्या सरकारी जाहिरातींचा उल्लेख केला आहे. या जाहिराती २ वर्षांसाठी बंद केल्या गेल्यास १२५० कोटी रुपये वाचू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. यातून कोरोनाशी संबंधित जनजागृतीपर जाहिराती वगळल्या जाव्यात, असं सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलं आहे.संसदेच्या नव्या इमारतीवर होणारा २० हजार कोटी रुपयांचा खर्च टाळा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सध्याच्या घडीला नव्या संसदेची आवश्यकता नाही. त्यामुळे या कामाला स्थगिती देण्यात यावी, असं सोनिया गांधीनी म्हटलं आहे. सरकारनं अर्थसंकल्पातील निधीत ३० टक्क्यांची कपात करावी, अशी सोनिया यांची तिसरी मागणी आहे. ही रक्कम साधारणत: २.५ लाख कोटी प्रतिवर्ष इतकी असल्याची आकडेवारी त्यांनी दिली आहे.राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द करण्याची सूचनादेखील त्यांनी केली आहे. अत्यंत गरजेच्या कारणांसाठीच परदेश दौरे केले जावेत, अशी सोनिया यांची चौथी शिफारस आहे. गेल्या वर्षी मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर ३९३ कोटी रुपये खर्च झाले होते, अशी आकडेवारी पत्रात आहे. पीएम केअर्स फंडातील रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला जावा, अशीदेखील शिफारस काँग्रेस अध्यक्षांकडून करण्यात आली आहे. यामुळे अधिक पारदर्शकता येईल. याशिवाय दोन वेगवेगळे सहाय्यता निधी सुरू ठेवण्यासाठी आवश्यक संसाधनंही वाचतील, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी