शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'त्या' दिवशी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हटलं जाईल; राहुल यांचा मोदींवर हल्लाबोल

By कुणाल गवाणकर | Updated: December 24, 2020 12:53 IST

सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात एल्गार

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. सरकारविरोधात उभ्या राहणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. मग ते शेतकरी असो, मजूर असोत. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसनंदेखील कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आज मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू करण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं.राहुल गांधी यांच्यासह आणखी दोन नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. 'पंतप्रधान मोदी मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतात, हे शेतकऱ्यांना माहीत आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलक शेतकरी घरी परतणार नाहीत, ही गोष्ट पंतप्रधान मोदींनी लक्षात घ्यावी. सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन घेऊन नवे कायदे रद्द करावेत,' असं राहुल म्हणाले.प्रियंका गांधींसह इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'अटक करायची, ताब्यात घ्यायचं हीच यांच्या कामाची पद्धत आहे. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. लोकशाही केवळ कल्पनेत जिवंत असू शकते. पण प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात नाही,' अशी टीका राहुल यांनी केली. चिनी सैन्यानं भारताची हजारो किलोमीटर जागा बळकावली. त्याबद्दल पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत?, असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी