कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन
By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST
कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन-२७ जून रोजी यवतमाळमधून प्रारंभ:मुंबई - शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार असून त्याचा प्रारंभ २७ जून रोजी यवतमाळ जिल्हयातून होणार आहे.प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजीव सातव यांच्या प्रमुख ...
कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन
कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आंदोलन-२७ जून रोजी यवतमाळमधून प्रारंभ:मुंबई - शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार असून त्याचा प्रारंभ २७ जून रोजी यवतमाळ जिल्हयातून होणार आहे.प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजीव सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे एका जाहीर सभेच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरूवात होईल. शेतकर्यांच्या प्रश्नावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.