शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. 11, 30 अन् 31...; संसदेत चिदंबरम यांच्या निर्मला सीतारमन यांच्याकडे 5 मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:44 IST

राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 वरील चर्चेला सुरुवात करताना पी चिदंबरम म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचण्यासाठी वेळ काढला, याचा मला विशेष आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पान क्रमांक 11, 30 आणि 31 वरील चांगल्या गोष्टी घेतल्या.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. वाढती महागाई आणि बेरोजगारी नियंत्रणात आणली गेली नाही तर, देशातील जनता भाजपला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणेच शिक्षा देईल, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. एवडेच नाही तर, सर्वसाधारण अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेवर आपल्याला पूर्ण विश्वास नाही आणि वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या निवडणुकीच्या आश्वासनाप्रमाणेच याचीही अवस्था होण्याची भीती वाटते, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या समोर आपल्या पाच मागण्या ठेवल्या आहेत.

राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 वरील चर्चेला सुरुवात करताना पी चिदंबरम म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचण्यासाठी वेळ काढला, याचा मला विशेष आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पान क्रमांक 11, 30 आणि 31 वरील चांगल्या गोष्टी घेतल्या. यानंतर, त्यांनी अर्थमंत्री सीतारमन यांना पाच मागण्यांवर विचार करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

चिदंबरम यांच्या मांगण्या -1. कोणत्याही कामासाठी किमान वेतन 400 रुपये प्रतिदिन करण्यात यावे.2. शेतकऱ्यांसाठी MSP ला कायदेशीर हमी देणे.3. मार्च 2024 पर्यंत दिलेल्या शैक्षणिक कर्जाचे व्याज आणि थकित हप्ते माफ करण्यात यावे.4. अग्निवीर योजना पूर्णपणे रद्द करणे.5. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी ज्या राज्यांना NEET नको आहे, तेथे ती रद्द करण्यात यावी. जर काही राज्यांना ती सुरू ठेवायची असेल, तर इतर राज्यांना त्यातून सूट देण्यात यावी.

या पाच मागण्यांवर केवळ सभागृहातच नाही, तर INDIA आघाडीला जेथे-जेथे आपले मत मांडण्याची संधी मिळेल तेथे-तेथे चर्चा होईल, असेही पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024