शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यांच्यावर फुटणार काँग्रेसच्या पराभवाचे खापर? चुकीची माहिती दिल्याने पक्षनेतृत्व नाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 17:47 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. दरम्यान, पक्ष संघटनेबाबत काँग्रेसमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, देशातील जनमताबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याने पक्षाने डेटा विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रवीण चक्रवर्ती यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच प्रसारमाध्यमांमधून काल्पनिक माहिती प्रसारित झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

माझ्यासंदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामधील प्रत्येक ओळ असत्यावर आधारीत आहे. ही भारतीय पत्रकारितेच्या पतनाची अंतिम सीमा आहे, असा आरोप काँग्रेसचे डेटा चिफ असलेल्या चक्रवर्ती यांनी एक वक्तव्य प्रासारित करून केला होता. मात्र चक्रवर्ती यांच्या या वक्तव्यानंतरही डेटा विभागाने दिलेल्या फीडबॅकबाबत काँग्रेसचे पक्षनेतृत्व खूप नाराज आहे. डेटा विभागाने नियमितपणे गोपनीय पद्धतीने दिल्या जाणाऱ्या पोलवर आधारित पूर्णपणे चुकीची माहिती पुरवली.  पक्षाचा डेटा विभाग जनमानसाचा कौल जाणून घेण्यात अपयशी ठरला, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.  काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर निवडणूक खूप कठीण झाली होती. सरकारने बालाकोटवर एअर स्ट्राइक केली. त्यामुळे भाजपाला राष्ट्रवादाच्या नावावर जनतेला प्रभावित करण्याची संधी मिळाली. या घटनेनंतर नरेंद्र मोदींबाबत जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला. तसेच आमच्या मुद्द्यांबाबत अधिकाधिक प्रश्न विचारले जाऊ लागले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ज्येष्ठ नेत्याने चक्रवर्ती यांनी घेतलेले पोल आणि निकालांवर थेट नाराजी व्यक्त केली होती, तसेच ही माहिती विश्वासार्ह नाही, असे सांगितले होते. तसेच बुथस्तरावर सदस्य जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले शक्ती अॅपही पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच काँग्रेस अध्यक्षांसोबत जवळीक करण्यासाठी चक्रवर्ती यांनी अनेक विश्वासू नेत्यांना दूर करण्याचे काम केले, असा आरोपही काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला.   

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण