गुवाहाटी : काँग्रेसचे ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केले तसेच आसाममध्ये सत्तेवर असताना या पक्षाने दहशतवादाला प्रोत्साहन दिले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आसाममध्ये ५,५०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस सत्तेवर असताना देशाची सुरक्षा नेहमीच धोक्यात होती. आसाममध्ये भय, असुरक्षिततेचे वातावरण होते.
ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच समाजात ध्रुवीकरण आणि मतपेढीचे राजकारण केले. देशाचे विभाजन मुस्लीम लीगमुळे झाले; पण आता माओवादी, मुस्लीम लीग व काँग्रेस असे घटक सक्रिय आहेत. आगामी पाच वर्षे आसामसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. काँग्रेस गेली १० वर्षे आसाममध्ये सत्तेवर नाही. त्यामुळे त्यांचे नेते विषारी वक्तव्ये करत आहेत. या पक्षाच्या लोकांनी शस्त्रखरेदीतही घोटाळे केले, असा आरोप मोदी यांनी केला.
‘आता आसाम सेमीकंडक्टर चीपसाठी होणार प्रसिद्ध’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आसाम चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे; पण आता हे राज्य जागतिक पातळीवर जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर चीपसाठी प्रसिद्ध होणार आहे.
२०१४ पासून ईशान्येतील १२५ पेक्षा जास्त लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी शनिवारी जाहीर सभेत दिली. आगामी विधानसभा निवडणुकांत भाजप आसाममध्ये सत्तेवर येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ब्रह्मपुत्रेवर 'कुमार भास्कर वर्मा सेतू' राष्ट्राला समर्पित
दौऱ्यात मोदींनी सर्वात आधी ब्रह्मपुत्रा नदीवर सुमारे ३,०३० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सहा पदरी 'कुमार भास्कर वर्मा सेतू'चे उद्घाटन केले. हा ईशान्य भारतातील पहिला 'एक्सट्राडोज्ड प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पूल' आहे, जो गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडेल.
'कुमार भास्कर वर्मा सेतू'च्या उद्घाटनानंतर मोदींनी पुलावरून पायी चालत पाहणी केली.या पुलामुळे गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीमधील प्रवासाचा वेळ कमी होऊन तो अवघ्या सात मिनिटांवर आला आहे.
मोदी यांनी आयआयएम गुवाहाटीचे तसेच संपूर्ण ईशान्य भारताला सेवा देणाऱ्या नॅशनल टेडा सेंटरचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. मोदी यांनी पीएम-ई-बस सेवा योजनेंतर्गत २२५ इलेक्ट्रिक बसनाही हिरवा कंदील दाखविला.
Web Summary : PM Modi criticized Congress for neglecting the Northeast and promoting terrorism while in power. He inaugurated projects worth ₹5,500 crore in Assam, highlighting improved security and development initiatives. He also inaugurated the Kumar Bhaskar Varma Setu, reducing travel time between Guwahati and North Guwahati.
Web Summary : पीएम मोदी ने कांग्रेस पर पूर्वोत्तर की उपेक्षा करने और सत्ता में रहते हुए आतंकवाद को बढ़ावा देने का आरोप लगाया। उन्होंने असम में ₹5,500 करोड़ की परियोजनाओं का उद्घाटन किया, बेहतर सुरक्षा और विकास पहलों पर प्रकाश डाला। उन्होंने कुमार भास्कर वर्मा सेतु का भी उद्घाटन किया, जिससे गुवाहाटी और उत्तरी गुवाहाटी के बीच यात्रा का समय कम हो गया।