शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा यू टर्न, राहुल गांधी चीनी राजदूतांना भेटल्याचे केले मान्य

By admin | Updated: July 10, 2017 16:28 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याचे काँग्रेसने मान्य केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार करणा-या काँग्रेसने अखेर आपल्या भूमिकेवरुन यू टर्न घेतला आहे.  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी फक्त चीनच नव्हे तर, भूतानचे राजदूत आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  शिवशंकर मेनन यांची भेट घेतली असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले. विविध देशांचे राजदूत वेळोवेळी काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भेट घेत असतात अशी सारवासारव सूरजेवाला यांनी केली. 
 
 शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांच्या भेट घेतल्याच्या बातम्या येत होत्या. सुरुवातीला काँग्रेसने हे वृत्त खोटं असल्याचं सांगत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे दिल्लीमधील चीनी दुतावासाने यासंबंधी आपल्या वेबसाईटवर (http://in.china-embassy.org) टाकलेलं स्टेटमेंट नंतर डिलीट करुन टाकल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं होतं.
 
आणखी वाचा 
राहुल गांधी ऑक्टोबरमध्ये काँग्रेसची सूत्र हाती घेण्याची शक्यता
राहुल गांधींची चीन भेट...हे तर "भक्तां"चं षडयंत्र - काँग्रेस
राहुल गांधी अजून अपरिपक्व - शीला दीक्षित
 
राहुल गांधी यांनी लुओ झुओई यांची भेट घेत सध्या भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेसने मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं.
 
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्टिवरच्या माध्यमातून आरोप केला आहे की, "काही न्यूज चॅनेल्स राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या खोट्या बातम्या चालवत आहेत". या बातम्या परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांकडून पेरण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 
 
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत सीमारेषेचा मुद्दा का उपस्थित केला नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं होतं. इतकंच नाही तर राहुल गांधी जर चीनी राजदूताला भेटले असतील तर त्यात मला काही वादासारखं दिसत नाही असंही त्या बोलल्या होत्या.