बदल्याच्या राजकारणाने डाव उलटणार काँग्रेसचा आपला इशारा
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिल्यानंतर बदल्याचे राजकारण केल्यास डाव उलटू शकतो, असे प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाने शनिवारी दिले.
बदल्याच्या राजकारणाने डाव उलटणार काँग्रेसचा आपला इशारा
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिल्यानंतर बदल्याचे राजकारण केल्यास डाव उलटू शकतो, असे प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाने शनिवारी दिले.काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी टिष्ट्वटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जे लोक बदल्याचे राजकारण करतात त्यांचा मतदार राजकीय बदला घेत असतात हे कुणी विसरू नये. आप नेते आणि केजरीवाल मंत्रिमंडळातील सदस्य मनीष सिसोदिया यांनी आप सरकार शीला दीक्षित आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे संकेत शुक्रवारी दिले होते. त्यावर सिंघवी यांनी उपरोक्त उत्तर दिले आहे. यापूर्वीच्या ४९ दिवसांच्या शासनकाळात नोंदविण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी पुढे सुरू राहणार असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले होते. केजरीवाल यांना आपली पाळेमुळे घट्ट रोवता यावीत आणि त्यांनी दिल्लीसाठी ज्या योजना राबविण्याची कल्पना केली आहे त्यापैकी काहींची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सिंघवी यांनी व्यक्त केली; सोबतच घूमजाव पहिलेपासूनच सुरू झाले असल्याचा टोलाही लगावला. (वृत्तसंस्था)