शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेतकऱ्यांना पळपुटे संबोधण्यावरून काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: May 1, 2015 01:46 IST

हरियाणाच्या मंत्र्याविरुद्ध पंतप्रधान काय कारवाई करणार? असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी या मुद्यावर सरकारला राज्यसभेत धारेवर धरले.

सरकारला सवाल : पंतप्रधान काय कारवाई करणार; भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने वादनवी दिल्ली : आत्महत्या करणारे शेतकरी पळपुटे असतात, असे म्हणत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या हरियाणाच्या मंत्र्याविरुद्ध पंतप्रधान काय कारवाई करणार? असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी या मुद्यावर सरकारला राज्यसभेत धारेवर धरले.शून्यप्रहरादरम्यान काँगे्रसचे आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करीत, भाजपशासित हरियाणा सरकारच्या कृषिमंत्र्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना पळपुटे संबोधणे गंभीर असल्याचे म्हटले. पंतप्रधान या प्रकरणी काय कारवाई करणार? असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी भाजप सदस्यांनी शर्मा यांना विरोध दर्शवला. राज्य सरकार, राज्य सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसंदर्भात या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. हे नियमांविरुद्ध असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. उपसभापती पी.जे. कुरियन यांनीही राज्य सरकारे आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगितले.आत्महत्या करणारे शेतकरी पळपुटे आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ.पी. धनकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)४सभागृहाबाहेर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची घोषणा करण्याचा मुद्दा समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी शून्यप्रहरादरम्यान राज्यसभेत लावून धरला. या सभागृहात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तीन दिवस चर्चा झाली. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच्या कुठल्याही उपाययोजनेचा उल्लेख केला नाही.४विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले. यानंतर अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बुधवारी सकाळी मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. लोकसभेत या निर्णयांची घोषणा केली. त्यानंतरच सभागृहाबाहेर मीडियाला याबाबतची माहिती दिली.