शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राज्यसभेत गोंधळ : काँग्रेस-भाजपा सदस्य आमनेसामने

By admin | Updated: April 28, 2016 04:50 IST

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केल्यावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केल्यावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली सुब्रमण्यम स्वामी हे सीआयएचे हस्तक असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी करताच भाजपचे सदस्यही संतापले. दोनी बाजूच्या सदस्यांना शांत करण्यात अपशय आल्याने सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले. ‘या हेलिकॉप्टर घोटाळ्याशी आपला संबंध नाही. कुणी आपले नाव घेत असेल तर घेऊ द्या, मी अजिबात घाबरत नाही,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले असून, हा चारित्र्यहननाचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेताच काँग्रेस सदस्य संतप्त झाले. यावेळी काही सदस्य हातवारे करीत सत्तारूढ सदस्यांकडे धावून गेले, पण लगेच मार्शल्सना बोलावण्यात आले. मार्शल्स सत्तारूढ बाकाजवळ उभे झाल्याने काँग्रेस सदस्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. या गोंधळात सभापती हामिद अंसारी यांनी कामकाज तहकूब केले.>सोनिया गांधींनी आरोप फेटाळलेअगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात देण्यात आलेल्या लाचेशी आपला आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा संबंध असल्याचा भाजपाने केलेला आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. ‘हे सर्व आरोप निराधार आहेत आणि माझे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाला माझे नाव घ्यायचे असेल तर घेऊ द्या. पण मी कुणालाही घाबरत नाही,’ असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, मागील दोन वर्षांपासून सत्तेवर असताना तुम्ही काय केले, ते आधी सांगा. माझ्यावरील आरोप निराधार आणि धादांत खोटे आहेत. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. पुरावे नसताना खोटे आरोप केले जात आहेत.>लोकसभेत चर्चेची काँग्रेसची मागणी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यावर लोकसभेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणीलोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही मागणी केली. पण सत्ताधारी सदस्यांनी एअरसेल-मॅक्सिस वादाचा विषय काढून हेलिकॉप्टर सौद्यावर चर्चा होउ दिली नाही.च्कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर कुरियन यांनी सोनिया गांधींचे नाव कामकाजातून वगळण्याची सूचना केली. जो सदस्य सभागृहात येऊन आपली बाजू मांडू शकत नाही त्या सदस्याचे नाव घेऊ नका. सोनिया गांधी या लोकसभेच्या सदस्य आहेत, असे कुरियन म्हणाले. परंतु काँग्रेस सदस्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी स्वामींच्या विरोधात घोषणा देणे सुरूच ठेवले.