शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘एपी’मुळे गोंधळ; विद्यार्थी गेला अरुणाचलऐवजी आंध्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:41 IST

आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.

नवी दिल्ली : आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.दानियाल खान या विद्यार्थ्याला नॅशनल इन्स्टिस्ट्यूट आॅफ इंडियात (एनआयटी) प्रवेशाची संधी मिळाल्याचे पत्र मिळाल्यावर तो आणि त्याचे कुटुंबीय हरखून गेले. त्याचे वडील आणि त्याच्या काही मित्रांनी एपीमधील एनआयटीच्या परिसरात रस्त्याने प्रवास करून जायचे ठरवले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशात पोहोचण्यास १६ तास लागले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. दानियालला ज्या एनआयटीने प्रवेश मंजूर केला होता ती एनआयटी आंध्र प्रदेशातील नव्हतीच. प्रवेशपत्रावर जे ‘एपी’ असा जो उल्लेख होता, तो आंध्र प्रदेशशी नव्हे, तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित होता. दानियालने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो म्हणतो की, एवढा प्रवास करून गेल्यानंतर समन्वयकांनी तुमचा गैरसमज झाल्याचे सांगितले. मला आलेल्या पत्रावर मला ‘एनआयटी-एपी’मध्ये प्रवेश मंजूर झाल्याचे म्हटले होते. आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘एपी’ असा केला जातो. मी आंध्र प्रदेशचा ९३० किलोमीटरचा प्रवास केला. आमच्यापैकी कोणालाही एपी म्हणजे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश असेल, असे वाटलेही नव्हते.दानियालने गुगलवर एनआयटी-एपी असे सर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती एनआयटी आंध्र प्रदेशची होती. त्याला आलेल्या पत्रातही अरुणाचलचा उल्लेख नव्हता. विद्यार्थी मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेश ते अरुणाचल हे अंतर २,५७५ किलोमीटर असून, तो सलग प्रवास ५१ तासांचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी