उड्डाणपुलांची प्रलंबित मागणी पूर्ण
By admin | Updated: March 22, 2016 00:41 IST
उड्डाणपुलांची प्रलंबित मागणी पूर्ण
उड्डाणपुलांची प्रलंबित मागणी पूर्ण
उड्डाणपुलांची प्रलंबित मागणी पूर्णजळगाव जिल्ातील सावदा, रावेर व निंभोरा या तीन ठिकाणी अनेक वर्षांपासून उड्डाणपुलांची मागणी प्रलंबित होती. या कामाच्या सर्वेक्षणाला रेल्वेतर्फे लगेच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जामनेर ते पाचोरा या मार्गावर धावणार्या पी.जे.रेल्वेला बोदवडपर्यंत मंजुरी मिळाली आहे. त्याचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. ही रेल्वे अजिंठापर्यंत यावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामपंचायतीसाठी केंद्रशासनातर्फे देण्यात येणार्या निधीतून होणार्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासदारांना अधिकार राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. डीपीआर तयार करण्यासाठी येत्या एक दोन दिवसात एजन्सी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.