शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टविरुद्ध तक्रारअर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 05:05 IST

एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करताना ती पॅकिंगच्या नावाखाली प्लास्टिक काही थरांमध्ये गुंडाळलेले असते.

बंगळुरू : उत्पादनांची ग्राहकांना डिलिव्हरी करताना अ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या पॅकिंगसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्लास्टिकचा वापर करत असल्याची तक्रारआदित्य दुबे अकरावीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली आहे. याप्रकरणी त्याने या दोन कंपन्यांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागितली आहे.

आदित्यने अर्जात म्हटले आहे की, एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करताना ती पॅकिंगच्या नावाखाली प्लास्टिक काही थरांमध्ये गुंडाळलेले असते. इतक्या आवरणांची खरे तर आवश्यकता नसते. त्यामुळे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांनी प्लास्टिकचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आदेश त्यांना राष्ट्रीय हरित लवादाने द्यावेत.त्याने सांगितले की, अनब्रेकेबल वस्तूही दोन-दोन कार्डबोर्ड बॉक्समध्ये घालून ग्राहकांना पाठविण्यात येतात. या बॉक्सवर प्लास्टिकचे तीन थरांचे आवरण असते. इनव्हॉईस व अन्य गोष्टींसाठी वेगळे प्लास्टिक आवरण असते. त्यांची गरज नसते.

प्लास्टिकचा वापर करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून होणाºया प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणविषयक संकट उभे राहाण्याची शक्यता आहे असेही आदित्यने म्हटले आहे. त्याच्या अर्जाची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादापुढे या आठवड्यातच होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)कंपन्यांची दखल नाहीई-कॉमर्स कंपन्या भारतात किती प्लास्टिक कचरा निर्माण करतात याबद्दलची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. प्लास्टिकचा अतिरिक्त वापर करणे टाळा असे टिष्ट्वट आदित्य दुबे याने अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट कंपन्यांना केले होते. पण त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. १६ वर्षे वयाच्या मुलाची कोण कशाला दखल घेईल असा सवाल त्यावर आदित्यने विचारला.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्ट