पनवेलमधील अनधिकृत व्यवसायाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात रोडवर जुगार खेळला जात असून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. तक्रार करून पोलीस लक्ष देत नसल्यामुळे एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
पनवेलमधील अनधिकृत व्यवसायाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात रोडवर जुगार खेळला जात असून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. तक्रार करून पोलीस लक्ष देत नसल्यामुळे एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हार्बर मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशनमध्ये पनवेलचा समावेश आहे. रोज हजारो प्रवासी येथून ये - जा करत असतात. स्टेशनच्या बसस्थानकाच्या बाजूला काही दिवसांपासून जुगाराचे अड्डे तयार झाले आहेत. ८ ते १० जणांची टोळी सकाळी व सायंकाळी रोडवर काळ्या, पिवळ्या चकत्या टाकून नागरिकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करतात. सुरुवातीला या टोळीतील तरुण जुगार खेळतात. ते मोठ्याप्रमाणात पैसे जिंकतातही. नंतर हा खेळ पाहण्यासाठी जमा झालेले तरुण व इतर नागरिक पैसे लावतात व हरतात. सर्वांसमक्ष नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. विजय कदम या तरुणाने जुगार अड्डा चालविणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरात गस्त घालणार्या पोलिसांकडे अनेक वेळा केली. परंतु सदर तरुणाच्या तक्रारीकडे पोलिसांनी लक्षच दिले नाही. यामुळे सदर तरुणाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात व इतर ठिकाणीही सुरू असलेल्या अवैध व्यवसायामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यांना लुबाडले जात आहे. कोणी पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांना धमकावले जात आहे. यामुळे अशाप्रकारे अवैध काम करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे. (प्रतिनिधी)विनंती बातमी घेणे